पॅन कार्ड म्हणजे काय? पॅन कार्ड चा उपयोग कोठे होतो? what is pan card? Permanent Account Number CBDT
पॅन कार्ड म्हणजे काय? पॅन कार्ड चा उपयोग कोठे होतो? what is pan card? Permanent Account Number CBDT
![]() |
पॅन कार्ड म्हणजे काय?
पॅन कार्ड म्हणजे {Permanent Account Number} अर्थात कायम खाते क्रमांक हे एक विशेष ओळखपत्र म्हणून वापरले जाते या पॅन कार्ड मध्ये दहा अंकी अल्फा न्यूमरिक क्रमांक असतो जो आयकर विभागाकडून कोणत्याही व्यक्ती संस्था कंपनी फॉर्म इत्यादींना जारी केला जातो.
Central board of direct tax (CBDT) :
पॅन कार्ड मध्ये नाव पत्ता जन्मतारीख वडिलांचे नाव सही फोटो अशी आवश्यक माहिती असते पॅन कार्डची संपूर्ण प्रक्रिया सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) अंतर्गत येते.
पॅन कार्ड क्रमांकाच्या आधारे सर्व कर संबंधित माहिती इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्या माध्यमातून रेकॉर्ड केली जाते.
पॅन कार्ड चा उपयोग कोठे होतो?
१)आयकर रिटर्न भरण्यासाठी
२)बँकेचे अकाउंट काढण्यासाठी
३)मुदत ठेव किंवा इतर कोणत्याही ठेवीसाठी
४)कर्ज घेण्यासाठी
५)क्रेडिट कार्ड घेण्यासाठी
६)मालमत्ता खरेदी विक्रीसाठी
७)घर विकत घेण्यासाठी
८)महागडे दागिने घेण्यासाठी
इत्यादीसाठी पॅन कार्ड चा वापर होतो.
👇हे पण वाचा.👇

