तुम्हाला किती रेशन मिळाले घरातील किती सदस्यांची नावे रेशन कार्ड मध्ये आहेत असे पहा.
Ration card :
रेशन कार्ड प्रत्येक कुटुंबात एक रेशन कार्ड असते हे रेशन कार्ड म्हणजे सरकारी दस्तऐवज म्हणून रेशन कार्ड स्वीकारले गेलेले एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. आता सर्व रेशन कार्ड डिजिटल झालेली आहेत म्हणजे प्रत्येक रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड डिजिटल झालेले आहे.
👇👇अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा 👇👇
ONE NATIN ONE RATION CARD { ONORC }:
वन नेशन वन रेशन.
कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक झाल्यामुळे रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात आलेले आहे .त्यामुळे रेशन कार्ड धारक भारतातील कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेऊ शकतात. डिजिटल रेशन कार्ड चा हा फार मोठा फायदा रेशन कार्ड धारकांना झालेला आहे.
रेशन कार्ड चे प्रकार :
लोकांच्या उत्पन्न गटानुसार रेशन कार्ड देण्यात येतात यात प्रामुख्याने पिवळे केशरी आणि सफेद असे प्रकार आहेत.
- अंत्योदय रेशन कार्ड.
- बीपीएल रेशन कार्ड.
- एपीएल रेशन कार्ड.
- अन्नपूर्णा रेशन कार्ड.
- प्राथमिकता रेशन कार्ड.
रेशन कार्ड वर किती शिधा धान्य मिळते असे पहा.
सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन मेरा रेशन नावाचे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
आपला बारा अंकी रेशन कार्ड नंबर असा पहा.
आपला रेशन कार्डचा डिजिटल बारा अंकी नंबर आपल्याला माहिती नसल्यास सर्वप्रथम ओपन झाल्यावर आधार शेडिंग या ऑप्शनवर जाऊन तुमचा आधार नंबर टाका.
👇👇हे पण वाचा👇👇
तेथे आता तुमचे रेशन कार्ड नंबर दिसेल तसेच कुटुंबातील किती व्यक्तींचे नाव डिजिटल रेशन कार्ड मध्ये आहे ते पण दिसेल तुमचा बारा अंकी नंबर रेशन कार्ड नंबर सेव करून घ्या
आता किती रेशन मिळाले त्यासाठी माय ट्रांजेक्शन वर क्लिक करा तेथे तुम्हाला तुमचा बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल तुम्हाला किती रेशन मिळाले किंवा किती बाकी आहे. तसेच मागील सहा महिन्यांमध्ये किती धान्य मिळाले ते पण पाहता येईल म्हणजेच आता रेशन दुकानदार तुम्हाला खोटे बोलू शकत नाही
"मित्रांनो वरील माहिती आवडली असेल तर कृपया ही माहिती जास्त लोकांना शेअर करा"






